S M L

पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा

यवतमाळमधील पांढरकवडा इथं पंतप्रधान मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 07:22 AM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा

यवतमाळ, 12 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये जाहीर सभादेखील होणार आहे.

यवतमाळमधील पांढरकवडा इथं पंतप्रधान मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटाची नोंदणी झाली आहे. त्यामुळे महिला व्यवसायिकदृष्ट्या काही प्रमाणात सक्षम झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर महिलांचे कौतुक करण्यासाठी नरेंद्र मोदी यवतमाळला येणार असल्याचं सांगण्यात येत आहेत. या दौऱ्यावेळी ते बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी माहिती दिली आहे.


मोदींचा सोलापूर दौरा

पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वीच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची उद्घाटने केली. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली होती.


Loading...

VIDEO : एकटा पडला 'राजा', मनसे लोकसभा लढणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 07:21 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close