पिंपरी शहर हादरलं; 3 मुलांसह महिलेची गळफास लावून आत्महत्या!

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 11:21 PM IST

पिंपरी शहर हादरलं; 3 मुलांसह महिलेची गळफास लावून आत्महत्या!

गोविंद वाकडे,पिंपरी, 28 जुलै: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने दोन मुली आणि एका मुलाला गळफास लावून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच दिवसांपूर्वी तळेगावहून बागवान कुटुंब भोसरीत राहण्यास आले होते. आज दुपारी बागवान कुटुंबातील या महिलेने आधी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला गळफास लावला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. हे कुटुंब मुळचे कर्नाटकातील आहे. नैराश्य आणि गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महिलेने नायलॉनच्या दोरीने मुलांना गळफास दिला. या मुलांचे वय 9 वर्ष, 7 वर्ष आणि 6 वर्ष असे आहेत. बागवान कुटुंब फळ विक्रीतून उदरनिर्वाह करत असे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी कोणतीही संशयास्पद अथवा चिट्ठी सापडली नाही. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

VIDEO: 'कलम 35 अ' हात लावाल तर जळून खाक व्हाल; मेहबुबा मुफ्तींची सरकारला धमकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: suicide
First Published: Jul 28, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...