Elec-widget

संतापजनक ! अडीच वर्षीय चिमुकलीचं अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या; पिंपरी चिंचवड हादरलं

संतापजनक ! अडीच वर्षीय चिमुकलीचं अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या; पिंपरी चिंचवड हादरलं

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (22 जुलै) संध्याकाळी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 24 जुलै : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (22 जुलै) संध्याकाळी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. या निष्पाप मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, अडीच वर्षीय चिमुकलीचं सोमवारी अपहरण करून घरामागील बाजूस तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर नराधमानं तिचा गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

(पाहा :VIDEO: पुण्यात तब्बल 15 गाड्यांची तोडफोड; 4 जण पोलिसांच्या ताब्यात)

नेमके काय घडलं?

अडीच वर्षांच्या या चिमुकलीचे सोमवारी रात्री उशिरा  दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात नराधमानं तिच्या राहत्या घरातून अपहरण केले. तिची आई झोपेतून जागी झाल्यानंतर आपली मुलगी घरात कुठेच नसल्याचं तिच्या लक्षात आलं. आई-वडिलांनी काही तास तिचा शोध घेतला. मात्र, तिचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.  सांगवी पोलिसांच्या 15 जणांच्या पथकाने पीडित चिमुकलीचा शोध सुरू केला. सर्व परिसर पिंजून काढला. शोधकार्य सुरू असताना घराच्या पाठीमागे काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळला. एका नाल्यात तिचा मृतदेह तरंगत होता. घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीचा मृतदेह औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तातडीने शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ माजली आहे.

(पाहा :VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसला, सखल भागांत साचलं पाणी)

Loading...

VIDEO: विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, इतर महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...