पिंपरी चिंडवडमध्ये समोर आलाय खाकी वर्दीतला रावण

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं केलेल्या कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाची मान शरमेन झुकेल अशी एक घटना समोर आलीये.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2018 11:39 PM IST

पिंपरी चिंडवडमध्ये समोर आलाय खाकी वर्दीतला रावण

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 13 ऑक्टोबर : कालपर्यंत ज्यांना तुम्ही हिरो समजत होतात त्यांच्यातला व्हिलन सोशल मीडियावरच्या 'मी-टू' कॅम्पेननं समोर आला. अनेकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे गळून पडले. देशात महिला अत्याचाराविरोधात हा आवाज बुलंद होत असताना पिंपरी चिंडवडमध्ये खाकी वर्दीतला रावण समोर आलाय. त्यामुळे पोलीस यू टू ? असं म्हणण्याची वेळ आलीय.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं केलेल्या कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाची मान शरमेन झुकेल अशी एक घटना समोर आलीये. पती सोबत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा सहायक फौजदार रामनाथ पालवे याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मधील चिखली पोलीस स्टेशन मध्ये घडलाय. 2 दिवसांपूर्वी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक महिला आपल्या पती विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेली होती, तेव्हा रामनाथ पालवे याने तिच्याशी लगट केली. तसेच अपरात्री आपल्याला फोन करून बोलतांना गैरशब्द वापरल्याचा आरोप संबंधित महिलेनं केलाय. या प्रकारामुळे घाबरलेली महिला काँग्रेस शहर अध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्याकडे गेली आणि त्यांनी हा प्रकार वरीष्ठ पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांना सांगितला. त्यानंतर सहाय्यक फौजदार रामनाथ पालवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुगळीकर यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

पिंपरी पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा अनादर होण्याची ही दूसरी घटना आहे. या आधीही पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका संगणक अभियंता तरुणीला पोलिसांनी चार तास बसवून ठेवत तीची तक्रारच घेतली नव्हती. या प्रकरणाला वाचा फुटताच संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्याच याच पोलिस आयुक्ताल्याच्या हद्दीत लहान मुलींवर बलात्कार झाल्याच्या पाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतांना, आता रक्षकच भक्षकासारखे कृत्य करत असतील तर नेमकी दाद तरी कुणाकडे मागयची ? हां खरा प्रश्न निर्माण झालाय.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून कठोर कायदे झाले, पण त्यांची अंमलबजावणी करणारे पोलीसच महिलांच्या अंगावर हात टाकत असतील तर महिलांनी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न शहर कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा गिरिजा कुदळे यांनी विचारलाय. तर, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि त्यात आरोपी रामनाथ पालवे दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई देखील केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

 #Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2018 11:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close