News18 Lokmat

शरीर संबंधाला नकार देणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला

कुकरेजा आणि फिर्यादी सोमवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून चालले होते.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 9, 2018 07:18 PM IST

शरीर संबंधाला नकार देणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला

पिंपरी, 09 मे : शरीर संबंधास एका पुरुषाने नकार देणाऱ्या पुरुषावर चाकूने वार करण्याची घटना सोमवारी रात्री हिंजवडी येथे घडली.

हरिश रमेश कुकरेजा (व्रा. लकी बेकरीसमोर, काळेवाडी) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत दत्तनगर चिंचवड इथं राहणाऱ्या २९ वर्षीय तरूणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी तरुण आणि आरोपी कुकरेजा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

कुकरेजा आणि फिर्यादी सोमवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून चालले होते. ते बिटकॉइन कंपनीसमोर आले असता त्यावेळी आरोपी कुकरेजा याने फिर्यादी तरूणाकडे शरीर संबंधांची मागणी केली. पण त्याने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या कुकरेजा याने धारदार चाकूने फिर्यादी तरुणाचा डाव्या हातावर वार करून जखमी केले.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2018 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...