S M L

पिंपरीत 8 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार

खराळवाडीमधील भागवत गीता मंदिरातील गाभाऱ्यामागे एका चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडलीये.

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2018 10:17 PM IST

पिंपरीत 8 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार

पिंपरी चिंचवड, 13 जून : कठुआतील मंदिरात चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचार देशवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. आता सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलीये.

खराळवाडीमधील भागवत गीता मंदिरातील गाभाऱ्यामागे एका चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडलीये.

शनिवारच्या सकाळी अकरा वाजता मंदिरासमोर आठ वर्षीय चिमुरडी खेळत होती. तेव्हा नेहमी मंदिरात वावरणारा नराधम रोहन भांडेकरने तिला आत बोलावले आणि गाभाऱ्यामागे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच, पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी नराधम रोहनला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 06:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close