S M L

फुलंब्री नगरपरिषदेत भाजपची सत्ता, आघाडीला धोबीपछाड

17 पैकी 11 जागा जिंकत भाजपचे सुहास शिरसाट नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2017 05:19 PM IST

फुलंब्री नगरपरिषदेत भाजपची सत्ता, आघाडीला धोबीपछाड

14 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री  नगर परिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत मोठा विजय मिळवलाय. 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपचे सुहास शिरसाट नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे.

फुलंब्री नगरपरिषदेसाठी बुधवारी मतदान पार पडले. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिला. भाजपचे 17 जागांपैकी 11 जागेवर उमेदवार विजयी झाले. भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांची नगराध्यक्षपदी निवड झालीये. फुलंब्री हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ आहे. या विजयाने हरिभाऊ बागडेंनी आपला गड कायम राखला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 05:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close