पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् ,शिवाजी महाराजांचे तैलचित्र सक्तीचे!

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् ,शिवाजी महाराजांचे तैलचित्र सक्तीचे!

हा प्रस्ताव महापालिकेत शिवसेनेकडून मांडला गेला होता. यावर चर्चाही करण्यात आली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून कोर्टाच्या निर्णयाची आठवण राष्ट्रवादीने करून दिली.

  • Share this:

पुणे, 13 नोव्हेंबर: पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीने गायलं जावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसवावं असा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम गाणं आणि शिवाजी महाराजांचे तैलचित्र ठेवणं अनिवार्य झालं आहे.

हा प्रस्ताव शुक्रवारी पुणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणला गेला होता. हा प्रस्ताव महापालिकेत शिवसेनेकडून मांडला गेला होता. यावर चर्चाही करण्यात आली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून कोर्टाच्या निर्णयाची आठवण राष्ट्रवादीने करून दिली.  वंदे मातरम ऐच्छिक असावं त्याची सक्ती नसावी असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे वंदे मातरम ऐच्छिक करण्याची उपसूचना राष्ट्रवादीने मांडली. पण भाजप सेनेने बहुमताच्या जोरावर ही उपसूचना फेटाळली आहे.

त्यामुळे आता पुण्यातील महापालिकांच्या शाळांमध्ये वंदे मातरम गायले जाणार असून शिवाजी महाराजांचे तैलचित्रही दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 08:57 AM IST

ताज्या बातम्या