पेट्रोलपंप दर रविवारी सुट्टीवर जाणार !

पेट्रोलपंप दर रविवारी सुट्टीवर जाणार !

पेट्रोलच्या कमिशनमध्ये ७५ पैसे तर डिझेलच्या कमिशनमधे ५० पैसे प्रती लीटर वाढ करण्यात यावी अशी पंपधारकांची मागणी

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

11 एप्रिल : पेट्रोल पंपांवर विकण्यात येणाऱ्या इंधनावरील कमिशनमध्ये मोठी वाढ देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेने देशातील सर्व पेट्रोलपंप दर रविवारी सुट्टीवर जातील असा इशारा दिला आहे.

१४ मे रोजी असलेल्या रविवारपासून प्रत्येक रविवारी पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी दिला आहे.

त्यानंतर १५ मे, सोमवारपासून पंपधारक केवळ एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत सेवा देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या शिवाय केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी पेट्रोल पंपधारकांनी येत्या १० मे रोजी इंधनाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे सरकार आणि पंपधारकांच्या भांडणात ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या कमिशनमध्ये ७५ पैसे तर डिझेलच्या कमिशनमधे ५० पैसे प्रती लीटर वाढ करण्यात यावी अशी पंपधारकांची मागणी आहे. सातत्यानं लेखी आणि तोंडी आश्वासनं देऊन देखील मागण्या पूर्ण केल्या नाहीत अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 06:48 PM IST

ताज्या बातम्या