S M L

राज्यातले पेट्रोलपंप आता दर रविवारी बंद राहणार

पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेनं देशातील सर्व पेट्रोलपंप आता दर रविवारी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 08:09 PM IST

राज्यातले पेट्रोलपंप आता दर रविवारी बंद राहणार

11 मे : पेट्रोल पंपांवर विकण्यात येणाऱ्या इंधनावरील कमिशनमध्ये मोठी वाढ देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेनं देशातील सर्व पेट्रोलपंप आता दर रविवारी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहे.

आंदोलनाच्या दिवशी संघटनेने तेल कंपणन्यांना बैठक बोलविण्याची विनंती केली होती. परंतु त्यास तेल कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.  १४ मे पासून प्रत्येक रविवारी महाराष्ट्रातील सर्व पंपचालक  सीएनजीचालकांसह सामूहिक सुट्टीवर जाणार आहे. १५ मे पासून महाराष्ट्रातील सर्व पंपचालक आणि सीएनजी पंपचालकांसह सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत सिंगल शिफ्ट ऑपरेशन नुसार चालू राहतील.

कामाची वेळ कमी करण्याचा निर्णय हा संघटनेला तेल कंपन्यांनी त्यांचे लिखीत आश्वासन न पाळल्याने आणि साधी चर्चाही करण्यास नकार दिल्याने करावे लागत आहे. याची नोंद राज्य सरकारने आणि जनतेने घ्यावी आणि सहकार्य करावं असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close