पेट्रोल- डिझेलचे भाव वाढता वाढता वाढे...

पेट्रोल- डिझेलचे भाव वाढता वाढता वाढे...

पेट्रोलच्या दरात ९ पैसे तर डिझेलच्या दरात १७ पैशांची वाढ

  • Share this:

मुंबई, ३० सप्टेंबर- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. पेट्रोलच्या दरात आज ९ पैशांची तर डीझलमध्येही वाढ झाली आहे. डिझेलमध्ये १७ पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ९० रुपये ८४ पैशांवर पोहोचलंय. त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईत सध्याचे पेट्रोलचे दर ७९.४० रुपये इतकं आहे.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरवाढीवर त्याचा परिणाम  होतोय. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेत. त्यातच आता ऑक्टोबरमध्ये पीएनजी गॅसची किंमत ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न उपस्थित राहतो.

वाहतूक खर्चामुळे काही शहरांमध्ये इंधन किंमती मुंबईपेक्षा अधिक आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार यात परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत. इथं पेट्रोल ९० रुपयांपेक्षा जास्त आहे.

Exclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 09:49 AM IST

ताज्या बातम्या