राज्यात इंधनावरचा अधिभार रद्द ; पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर स्वस्त

राज्यात पेट्रोल प्रती लिटर ६७ पैसे, डिझेल प्रती लिटर १.२४ पैसे आणि गॅस सिलेंडर ११ रुपयाने स्वस्त झालंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2017 09:15 PM IST

राज्यात इंधनावरचा अधिभार रद्द ; पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर स्वस्त

11 जुलै : महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल वरील स्टेट स्पेसिफीक सरचार्ज़ रद्द करण्यात आलाय अशी घोषणा ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी केलीये. त्यामुळे राज्यात पेट्रोल प्रती लिटर ६७ पैसे, डिझेल प्रती लिटर १.२४ पैसे आणि गॅस सिलेंडर ११ रुपयाने स्वस्त झालंय.

महाराष्ट्रात मुंबईत तेल कंपण्यांचे दोन रिफायनरी आहेत. सदर रिफायनरीमध्ये जे कच्चे तेल आयात होते. त्यावर मुंबई महानगरपालिका जकात वसूल करत होती, सदर जकातीची रक्कम ही वार्षिक ३००० कोटी होती आणि त्याच्या वसुली पोटी महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोल, डीझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या स्टेट स्पेसिफीक सरचार्ज वसूल करित होत्या.

जीएसटी कायदा मंजुर झाल्यानंतर मुंबईतील कच्च्या तेलावरील जकातही मुंबई महानगर पालिकेनं थांबवल्याने सदर SSC कर रद्द न करता तेल कंपण्या महाराष्ट्रात वसूली करत असल्याबाबत तक्रार फामपेडा या संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण खात्याकडे ०३ जुलै रोजी केली होती.

याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धरमेंद्र प्रधान यांची पुण्यात ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी भेट घेतली. या बैठकीनंतर  केंद्रीय मंत्र्यांनी तेल कंपण्यांना सदर अतिरिक्त कर पुढील पाच दिवसात रद्द्द करण्याचे आदेश दिले होते.

अखेर १० जुलै रोजी सदर अतीरिक्त कर रद्द झाला आहे. त्यामुळे पेट्रोल प्रती लितर ६७ पैसे, डिझेल प्रती लिटर १.२४ पैसे आणि गॅस सिलेंडर ११ रुपयाने स्वस्त झालं आहे अशी माहिती पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...