पेट्रोल पंप रविवारीही सुरू राहणार, पेट्रोल पंप चालकांचं सुट्टी आंदोलन मागे

पेट्रोल पंप रविवारीही सुरू राहणार, पेट्रोल पंप चालकांचं सुट्टी आंदोलन मागे

दर रविवारी सुट्टी जाण्याचा निर्णय घेतलेल्या पेट्रोल पंप चालकांनी आपलं हे नियोजित आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार आहे.

  • Share this:

13 मे : दर रविवारी सुट्टी जाण्याचा निर्णय घेतलेल्या पेट्रोल पंप चालकांनी आपलं हे नियोजित आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार आहे.

पेट्रोल पंपांवर विकण्यात येणाऱ्या इंधनावरील कमिशनमध्ये मोठी वाढ देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेनं दर रविवारी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्या 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार अशी घोषणा या संघटनेनं केली होती.

मात्र, आॅईल कंपन्यांनी आज या पेट्रोल पंप चालकांच्या प्रतिनिधीसाठी चर्चेला बोलावण्यात आलंय. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांनी उद्याचं नियोजित आंदोलन मागे घेतलंय. उद्या पेट्रोलपंप सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 05:04 PM IST

ताज्या बातम्या