S M L

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सोमवारी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला आहे. तर पेट्रोलने ७१ रूपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2018 11:37 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

16 जानेवारी : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सोमवारी उच्चांक गाठला आहे. सोमवारी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला आहे. तर पेट्रोलने ७१ रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.

तेल कंपन्यांच्या दर तक्त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल मुंबईत महाग मिळतं. त्यामुळे सध्या मुंबईत प्रती लीटर डिझेलची किंमत ६५.७४ रूपयांवर पोहोचली आहे. याची तुलना करायची झाल्यास गेल्या महिन्याभरात डिझेलच्या प्रती लीटर दरात ३.४० रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत २.०९ रूपयांनी वाढली आहे. तर पुण्यात 78.89 तर डिझेल 64.66 रुपये प्रतिलिटर होते.

शनिवारी पुण्यात पेट्रोल 79 रुपये तर डिझेल 64 रुपये प्रतिलिटर इतकं होतं. १२ डिसेंबर २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत.

पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर खालीलप्रमाणे

पेट्रोल प्रति लीटर / डिझेल प्रति लीटर

Loading...
Loading...

- मुंबई - पेट्रोल 79.15 रु. डिझेल 65.90 रु.

- पुणे - पेट्रोल 78.89 रु. डिझेल 64.66 रु.

- नाशिक - पेट्रोल - 79.48 रु. डिझेल 65.25रु.

- औरंगाबाद - पेट्रोल - 80.08 रु. डिझेल - 66.84 रु.

- रत्नागिरी - पेट्रोल - 79.74 रु. डिझेल - 65.64 रु

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 11:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close