Elec-widget

इंधन दर वाढ सुरूच... पेट्रोल ९ पैशांनी महाग तर डिझेल ७० पैशांनी स्वस्त

इंधन दर वाढ सुरूच... पेट्रोल ९ पैशांनी महाग तर डिझेल ७० पैशांनी स्वस्त

अमेरिकेचा दबाव झुगारून भारत इराणकडून तेलखरेदी सुरूच ठेवणार आहे

  • Share this:

मुंबई, ०६ ऑक्टोबर- केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत पाच रूपयांची घट केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ देखील केली. पेट्रोल आज १८ पैशांनी महागलं तर डिझेल मात्र ७० पैशांनी स्वस्त झालं. दरम्यान, ६ नोव्हेंबरपासून इराणवर अमेरिका निर्बंध लादणार आहे. पण अमेरिकेचा दबाव झुगारून भारत इराणकडून तेलखरेदी सुरूच ठेवणार आहे. फरक इतकाच असेल की इराणला तेलाच्या बदल्यात डॉलरमध्ये नव्हे तर रुपयांमध्ये पैसे दिले जाणार आहेत. युको बँक आणि आयडीबीआय बँकेच्या मार्फत इराणला पेमेंट करण्याची व्यवस्था सरकारनं केली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झालंय. भारतात पेट्रोलचे दर नव्वदी पार करून परत आलेत, त्यामुळे इराणशी व्यापार संबंध तोडणं सध्या शक्य नसल्याचं भारताकडून अमेरिकेला सांगण्यात आलं आहे. पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त झालंय. केंद्रानं डिझेलचे दर प्रति लिटर अडीच रुपयांनी कमी केल्यानंतर आता राज्यानं डिझेलच्या दरात  दीड रुपयांनी कपात केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून १ रुपया तर केंद्र सरकारने दीड रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात झाल्याची घोषणा जेटली यांनी केली होती. या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर १०.५० हजार कोटींचा भार पडणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...