पाळीव कुत्री त्रास देते म्हणून विषारी इंजेक्शन देऊन ठार मारलं

पाळीव कुत्री त्रास देते म्हणून विषारी इंजेक्शन देऊन ठार मारलं

या प्रकरणी एका महिलेसह प्राण्यांच्या डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर : पाळीव कुत्री लहान मुलांना त्रास देऊ लागल्यामुळे एका डॉक्टराच्या सल्ल्याने त्याला विषारी इंजेक्शन देऊन जीवे मारल्याचा प्रकार पुण्यातील हडपसर येथील अॅमोनोरा पार्क परिसरात घडला. या प्रकरणी एका महिलेसह प्राण्यांच्या डॉक्टरवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात स्वारगेट परिसरात मिशन पॉसिबल नावाची भटके आणि पाळीव प्राण्यांना सांभाळणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत कुत्र्यांचा सांभाळ करून चांगल्या कुटुंबीयांना दत्तक दिले जाते.    पाळीव कुत्र्याला मारलं म्हणून पद्मिनी पीटर स्टंप यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिलीये. ऑगस्ट २०१७ मध्ये सक्सेना त्यांच्याकडे लियाला ठेवण्यासाठी आल्या होत्या. स्टंप यांच्याकडे नऊ वर्षांपूर्वी घेतलेली लिया ठेवण्यात आली होती.

काही दिवसांनी स्टंप यांनी लिया कुत्रीला मुंबई येथील एका कुटुंबीयांना दत्तक दिली. सक्सेनांना हे समजल्यावर परवानगीशिवाय कुत्री कशी दत्तक दिली, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांनी तिची कुत्री परत दिली होती. दोन दिवसांपूर्वी स्टंप यांना मैत्रिणीचा फोन आला. लियाला सक्सेनाने जीवे मारल्याचं सांगितलं. त्यानंतर एक डॉक्टरच्या मदतीने लियाला विषारी इंजेक्शन देऊन मारल असल्याचा आरोप स्टंप यांनी केला आहे.

जेव्हा आमच्या संस्थेत ही कुत्री होती त्यावेळी दीड महिने कोणालाही चावला नाही. मुक्या लियाला ९ वर्षांपासून सांभाळत असलेल्या स्टंप यांना तिचा मृत्यू झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे या आरोपीना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 10:48 AM IST

ताज्या बातम्या