यवतमाळ, 04 आॅक्टोबर : यवतमाळमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कीटकनाशक फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिकंदर शाह या व्यक्तीनं कीटकनाशक फेकण्याचा प्रयत्न केला. सिकंदर शाहला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मात्र यवतमाळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी सदाभाऊंना घेराव घातला. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज सदाभाऊ यवतमाळमध्ये गेले आहेत.
राज्य सरकारने या प्रकरणातील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे पण ही मदत तोकडी असल्याच सांगत असल्याचं विरोध केलाय. एवढंच नाहीतर 19 शेतकऱ्यांचा जीव घेणारं कीटकनाशकाची सर्रासपणे विक्री सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा