S M L

कार्तिकी एकादशीला पंढरीत भाविकांची गर्दी

पहाटे दोनच्या सुमारास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान कर्नाटक राज्यातील विजापूर मधील हडगली येथील बळीराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शिनाबाई चव्हाण या दांपत्याला मिळाला.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 08:51 AM IST

कार्तिकी एकादशीला पंढरीत भाविकांची गर्दी

पंढरपूर, 30 ऑक्टोबर:आज कार्तिकी एकादशी. एकादशीच्या या महापर्वणी सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आदी राज्यातून चार लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मध्ये दाखल झालेत.

वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या या भक्तांनी चंद्रभागेचे स्नान करून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. अवघी पंढरी नगरी श्री विठू रखुमाईच्या नामस्मरणात तल्लीन झालेली असतानाच पहाटे दोनच्या सुमारास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान कर्नाटक राज्यातील विजापूर मधील हडगली येथील बळीराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शिनाबाई चव्हाण या दांपत्याला मिळाला. मंगलमय वातावरणात पार पडलेल्या पूजेनंतर सहकारमंत्री पाटील यांनी राज्यातील जनता सुखी व सुरक्षित राहू दे, शेतामध्ये धनधान्य पिकू दे आणि शेती मालाला चांगला भाव मिळू दे असं साकडं घातल्याचे पाटील म्हणाले.

  

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close