संतापजनक!PUBG खेळण्यास केला मज्जाव,अर्धनग्न होईपर्यंत महिलेला अमानुष मारहाण

पबजी गेम खेळण्यास मज्जाव केला म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 03:00 PM IST

संतापजनक!PUBG खेळण्यास केला मज्जाव,अर्धनग्न होईपर्यंत महिलेला अमानुष मारहाण

डोंबिवली, 29 जुलै : ऑनलाइन गेम पबजीमुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं दिसत आहे. या गेमच्या वेडापायी काही जण घर राहतं सोडून जात आहेत तर काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. पण आता तर चक्क पबजी गेम खेळण्यास मज्जाव केला म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्ध नग्न होईपर्यंत या महिलेला अमानुष मारहाण सुरूच होती. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील विशाल भोईर इमारतीतील ही घटना आहे. पीडित महिलेनं पबजी खेळण्यास मज्जाव केला म्हणून शेजाऱ्याच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केली. याप्रकरणी राम नगर पोलीस चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

(पाहा :VIDEO: पालिका आणखी किती बळी घेणार? मॅनहोलमध्ये पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)

जिन्यावर बसून पबजी खेळणाऱ्या काही तरुणांना पीडित महिलेनं मज्जाव केला. याचाच राग मनात ठेऊन तिच्या शेजारी राहणाऱ्या मीना कदम, मनिष कदम, मानसी कदम, गरिमा त्रिवेदी यांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होत की महिलेच्या अंगावरचे कपडेदेखील फाटले. तरीही या शेजाऱ्यांनी तिची दया आली नाही, त्यांची मारहाण सुरूच होती.  मारहाणीत दुखापत झाल्याने पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झालेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

(पाहा :राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश?)

VIDEO: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...