सिंधुदुर्गात वाहतूक संघटनेचे खड्डे दुरूस्तीसाठी 'गुलाब देऊन' आंदोलन

सिंधुदुर्गात वाहतूक संघटनेचे खड्डे दुरूस्तीसाठी 'गुलाब देऊन' आंदोलन

खड्डे बुजवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पंधरा डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेली पंधरा डिसेंबरची डेडलाईन संपेपर्यंत अनेकांचे जीव जातील. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरावेत यासाठी वाहतूक संघटनेने हे आंदोलन केलं आहे

  • Share this:

सिंधुदुर्ग,02 नोव्हेंबर: सिंधुदुर्गातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरच खड्डे बुजवण्याच काम तातडीने पूर्ण करावं यासाठी वाहतूकदार संघटनेने कुडाळजवळ गांधीगिरी आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला गुलाबाचं फूल देऊन आंदोलन करत आहेत.

खड्डे बुजवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पंधरा डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेली पंधरा डिसेंबरची डेडलाईन संपेपर्यंत अनेकांचे जीव जातील. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरावेत यासाठी वाहतूक संघटनेने हे आंदोलन केलं आहे . येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकाना थांबवून त्यांना गुलाबाचं फूल देत अशा जीवघेण्या खड्ड्यातून चांगली गाडी चालवल्याबध्दल त्यांच अभिनंदन केलं जातंय. यामुळे मुंबई गोवा महामार्गारची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 12:40 PM IST

ताज्या बातम्या