नागपुरात अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी शरद पवार स्वतः धावून गेले

आज शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला कारने जात असताना रस्त्यात त्यांना दोन टिप्परच्या मध्ये एक कार अपघातामुळे अडकलेली दिसली. या कारमध्ये पती - पत्नी, एक मुलगा आणि एक सहा वर्षांचा लहान मुलगा जखमी झाले होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 01:15 PM IST

नागपुरात अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी शरद पवार स्वतः धावून गेले

नागपूर, 15 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एका अपघातग्रस्त परिवारासाठी धावून गेलेत. आज शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला कारने जात असताना रस्त्यात त्यांना दोन टिप्परच्या मध्ये एक कार अपघातामुळे अडकलेली दिसली. या कारमध्ये पती - पत्नी, एक मुलगा आणि एक सहा वर्षांचा लहान मुलगा जखमी झाले होते.

यावेळी शरद पवार यांनी त्या ठिकाणी आपला ताफा थांबवला आणि पोलिसांना त्या अपघातातील जखमींना बाहेर काढायला सांगितलं.

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. मात्र हे दृश्य पाहून अनेकांनी राजकीय क्षेत्रातील माणसाचं दर्शन घडल्याच्या भावना व्यक्त केल्याचं म्हटलं जातं. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

त्यानंतर पोलिसांच्याच गाडीतून त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं. यानंतर ते गडचिरोलीला रवाना झाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...