S M L

शरद पवारांची दिवाळी बारामतीत साजरी

बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आनि सर्व पवार कुटुंबीय एकत्र येऊन पाडवा साजरा करतात. यादिवशी सगे सोयरे, कार्यकर्ते ,पक्षातील नेते त्यांना भेटायला येतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबीय देत असतात

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 20, 2017 03:11 PM IST

शरद पवारांची दिवाळी बारामतीत साजरी

बारामती,20 ऑक्टोबर: संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते . माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यात सर्वात पुढे असतात .

बारामतीतील माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासुन शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आनि सर्व पवार कुटुंबीय एकत्र येऊन पाडवा साजरा करतात. यादिवशी सगे सोयरे, कार्यकर्ते ,पक्षातील नेते त्यांना भेटायला येतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबीय देत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते गोविंद बागेत येतात.पवार साहेबांना भेट देऊन जातात.

असा हा पाडव्याचा सण बारामतीत शांततेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साजरा करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close