Elec-widget

खरंच माणुसकी मेली ; 'तो' जळत होता आणि लोकं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकाॅर्ड करत होते

खरंच माणुसकी मेली ; 'तो' जळत होता आणि लोकं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकाॅर्ड करत होते

बीड जिल्ह्यातील माजलगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक झाली. यात मोटार सायकलने पेट घेतल्यानं एकाचा जळून मृत्यू झाला.

  • Share this:

13 मे : रस्त्यावर झालेल्या एका अपघातात एक तरुण भर रस्त्यावर जळत होता पण त्याहुन धक्कादायक आणि संतापजनक म्हणजे  तिथे जमलेले लोकं त्या तरुणाची मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ मोबाईलवर रेकाॅर्ड करत होते. ही संतापजनक घटना घडलीये बीडमध्ये.

बीड जिल्ह्यातील माजलगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक झाली. यात मोटार सायकलने पेट घेतल्यानं एकाचा जळून मृत्यू झाला. तर अन्य दोन जण या अपघातात गंभीर जखमी झालेत. पण अत्यंत गंभीर म्हणजे या अपघातात मोटार सायकलस्वार रस्त्यावर जळत असताना त्याच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही.

उलट बाजूला उभे असलेल्या लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला. पण त्या बाईकस्वाराला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या अपघातात ज्या मोटार सायकलस्वाराचा जळून मृत्यू झालाय त्याची अजूनही ओळख पटली नाही. शिवाय त्या मोटार सायकलची देखील ओळख पटत नाही, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...