News18 Lokmat

शिवशाही बसला भीषण अपघात, 15 प्रवाशांसह चालक गंभीर जखमी

पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या शिवशाही बसला रांजणगाव गणपती येथे भीषण अपघात झाला. अपघातात 15 प्रवाशांसह बस चालक गंभीर जखमी झाला आहे.

Manoj Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 12:50 PM IST

शिवशाही बसला भीषण अपघात, 15 प्रवाशांसह चालक गंभीर जखमी

पुणे, 15  एप्रिल : पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या शिवशाही बसला रांजणगाव गणपती येथे भीषण अपघात झाला. अपघातात 15 प्रवाशांसह बस चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी (14 एप्रिल) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातावेळी बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी जखमींना  हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी वातानुकूलित सुविधा असणारी शिवशाही रस्त्यावर उतरविली आहे. मात्र, आता हीच शिवशाही अनेक प्रवाशांच्या जिवावर एक संकट घेऊन येत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.

वाचा अन्य बातम्या

मुरली मनोहर जोशींचे अडवाणींना पत्र, काय आहे सत्य?

VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण

Loading...

मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असं का म्हणाल्या जयाप्रदा पाहा VIDEO

VIDEO: नाशिक-मुंबई महामार्गावर बिबट्याची शतपावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...