कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

संघटनेविरोधी भूमिका घेतल्याचा सदाभाऊंवर ठपका ठेवण्यात आलाय..गेल्या अनेक दिवसांपासून खोत आणि शेट्टी यांच्यात उडालेल्या खटक्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेच.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2017 03:26 PM IST

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

07 आॅगस्ट : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. ४ सदस्यांच्या चौकशी समितीनं आज निर्णय जाहीर केला. सदाभाऊंच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्हं आहे, त्यांना सत्ता उपभोगण्यात जास्त रस आहे. पुणत्यांब्यांहून सुरू झालेल्या शेतकरी संपात सदाभाऊंनी फूट पाडली, असे त्यांच्यावर प्रमुख आरोप आहेत.

स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातल्या १५० संघटना एकत्र आल्या मात्र केंद्राचा विषय म्हणून सदाभाऊ आलिप्त राहिले. त्यांना मलबार हिलच्या सत्तासुंदरीत जास्त रस आहे. त्यांच्यामुळे स्वाभिनमानीची बदनामी झालीय, अशी पक्षाची भूमिका आहे. आता मंत्रिपदाचं काय होणार, ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close