पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे 'ते' फोटो व्हायरल, पुण्यात गुन्हा दाखल

पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे 'ते' फोटो व्हायरल, पुण्यात गुन्हा दाखल

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत.

  • Share this:

पिंपरी, 27 एप्रिल- मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नागवडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्ह्याधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.

'पीसीएमसी शिवसेना' फेसबुक पेज तसेच श्रीमंत व इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील हे फोटो आहेत. राजकारणात संबंधित तरुणीचा नाहक बळी दिला व तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत. विरोधी पक्षाचे हे कारस्थान असून पार्थ पवार यांची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खासगी फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेज तसेच व्हाट्सअप्प ग्रुप यासारख्या सोशल मीडियात व्हायरल केल्याचे असल्याचे वैशाली नागवडे यांनी म्हटले आहे.

वैशाली नागवडे म्हणाल्या निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे फोटो व्हायरल करुन राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा पोस्ट, फोटो व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस फोटो, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची माहिती गोळा करत आहेत.


VIDEO: राज ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपचं 'कॉपीपेस्ट'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या