पार्थ पवारांची स्टंटबाजी, कोणतीही सभा नसताना धावले? पाहा व्हिडीओ

उशिर झाला म्हणून सभास्थळी जाण्यासाठी पार्थ पवार धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 09:43 PM IST

पार्थ पवारांची स्टंटबाजी, कोणतीही सभा नसताना धावले? पाहा व्हिडीओ

मुंबई, 28 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पण त्यांना पहिल्या भाषणापासून टीकेचा सामना करावा लागत आहे. मराठी स्पष्ट बोलता येत नसल्याने पार्थ पवारांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतर एका धार्मिक कार्यक्रमात गाण्यावर धरलेला ठेकासुद्धा ट्रोलर्सच्या नजरेतून सुटला नाही.

बुधवारी त्यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करून लोकांशी संवाद साधला. त्यानंतर रात्री पनवेलमध्येच मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. परिसरातील नागरिकांची भेट घेऊन ते मशिदीत जाणार होते.

मोहल्ला परिसरात जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेल मध्ये वाऱ्या सारखा पसरल्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतोय. परंतु मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं समोर येत असून हा निवडणूक पूर्व स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे. या स्टंटमुळे सोशल मीडिया वर पार्थ यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येतं असून निवडणुकीपर्यंत असे अनेक स्टंट पहायला मिळतील अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.

VIDEO: पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...