पार्थ पवार यांच्या मावळमध्ये या अपक्ष उमेदवाराची का आहे चर्चा?

पार्थ पवार यांच्या मावळमध्ये या अपक्ष उमेदवाराची का आहे चर्चा?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघ चांगलाच गाजतो आहे. पण याच मतदारसंघात आणखी एका उमेदवाराचीही जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत त्यांचा अजेंडाही वेगळा आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे

मावळ, 23 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघ चांगलाच गाजतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे अशी लढत इथे होते आहे. पण याच मतदारसंघात आणखी एका उमेदवाराचीही जोरात चर्चा आहे. डॉक्टर नवनाथ दुधाळ हे ते अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी अनोखा अजेंडा घेऊन ते रिंगणात उतरले आहेत.

देशी गायींचं संवर्धन

देशी गायींचं संवर्धन आणि कॅन्सरमुक्त भारत हा डॉक्टर नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा आहे. निवडणुकीच्या माध्यमातून देशी गायींचं संवर्धन करण्याचा मुद्दा त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी मतदारांची थेट भेट घेऊन डॉक्टर दुधाळ जनजागृती करत आहेत.

कॅन्सरमुक्त भारत

देशासमोर कॅन्सरनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठीही दुधाळ यांच्याकडे अजेंडा आहे.तो ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरी

डॉक्टर नवनाथ दुधाळ टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते मात्र त्यांनी ही नोकरी सोडली. नवनाथ दुधाळ यांचे प्रचाराचे बॅनरही हटके असेच आहेत. 'दवा ना खाना' असं दुधाळ यांच्या प्रचाराच्या बॅनरवर लिहिलं आहे.

मतदारांची पसंती

स्वदेशी वापरा, शेतकरी व देश वाचवा, विषमुक्त अन्न खा व निरोगी राहा, पंचगव्य योगचा वापर करा, असे संदेश डॉक्टर दुधाळ देत आहेत. मावळमध्ये पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे अशी मोठी लढत होत असताना हा अनोखा उमेदवार आणि त्याचा हा प्रचार कार्यकर्ते, मतदार यांच्या पसंतीस पडतो आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. हाच अधिकार वापरून डॉक्टर नवनाथ दुधाळ त्यांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. आता मतदार निवडणुकीत दुधाळ यांना कसा प्रतिसाद देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

===================================================================================

SPECIAL REPORT : 'या' उमेदवाराचा अजेंडाच आहे गाय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 09:03 PM IST

ताज्या बातम्या