S M L

पार्थनेही दाखवली पवार पॉवर, विरोधातले नेतेही दिसू लागले सोबत

मावळ मतदारसंघात ज्या पक्षाचा खासदार आहे त्या शिवसेनेचे नेतेही आता पार्थ पवार यांच्यासोबत फोटोसेशन करताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 03:46 PM IST

पार्थनेही दाखवली पवार पॉवर, विरोधातले नेतेही दिसू लागले सोबत

मावळ, 12 जानेवारी : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. अशातच पार्थ पवार यांच्या या भागातील वाढत्या उपस्थितीमुळे त्याला दुजोरा मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे मावळ मतदारसंघात ज्या पक्षाचा खासदार आहे त्या शिवसेनेचे नेतेही आता पार्थ पवार यांच्यासोबत फोटोसेशन करताना दिसत आहेत.

कधीकाळी राष्ट्रवादीमध्ये असलेले मात्र सध्या इतर पक्षांमध्ये कार्यरत असलेले जुने नेते हे आता पार्थ पवार यांच्याशी जवळीक साधत असल्याचं बघायला मिळतं आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि भाजपचे (सलग्न) नगरसेवक नवनाथ जगताप यांनी तर चक्क पार्थ पवारांसोबत फोटोसेशन केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. असं असतानादेखील शिवसेनेच्या आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पार्थ पवारांसोबत केलेलं हे फोटोसेशन सध्या चर्चेत आहे. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना विचारल असता ते म्हणाले, 'एका कार्यक्रमादरम्यान पार्थ पवारांची सहज भेट झाली. त्यावेळी फोटो काढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. आपण निवडणुकीत आपण शिवसेनेचंच काम करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.


'कोण पार्थ पवार?'

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार, असा सवाल विचारला होता. मावळ लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार मीच असेल असं असा आत्मविश्वासही बारणे यांनी व्यक्त केला आहे.


Loading...

VIDEO : परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडीतून सवारी, लगाम धनंजय मुंडेंच्या हाती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 03:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close