पार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी? कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान

पार्थ पवार यांनी वडील अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहीम राबवली.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 03:53 PM IST

पार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी? कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 22 जुलै : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण पार्थ यांनी आज आपले वडील अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता मोहीम राबवली. पण पार्थ यांनी जिथं स्वच्छता केली तिथं कचराच नसल्याचं समोर आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पार्थ पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडकरांच्या समोर आले. यावेळी पार्थ पवार यांच्या स्वच्छता अभियानासोबतच त्यांनी भर-रस्त्यावर वडील अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याने ते चर्चेचा विषय झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य भाजी मंडईच्या आत कचरा आणि दुर्गंधी साचलेली असताना पार्थ यांनी मंडईबाहेर स्वच्छता मोहीम राबवली. ही मोहीम कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी होती तर त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कार्यलयात भेट न घेता त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट का घेतली? हा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना विचारलं असता त्यांनी स्टंटबाजीचे आरोप फेटाळले आहेत. तसंच कचरा समस्येप्रकरणी राष्ट्रवादी दक्ष असल्याचंही वाघेरे यांनी म्हटलं आहे.

चोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...