S M L

भंडाऱ्यात गारपिटीमुळे 452 पोपटांचा मृत्यू

गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मात्र, कालच्या तुफान गारपिटीत या झाडावरील 425 पोपटांचा मृत्यू झाला

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 04:19 PM IST

भंडाऱ्यात गारपिटीमुळे 452 पोपटांचा मृत्यू

भंडारा, 14 फेब्रुवारी : भंडाऱ्यात गारपिटीमुळे 452 पोपटांचा मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 452 पोपटांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मात्र, कालच्या तुफान गारपिटीत या झाडावरील 425 पोपटांचा मृत्यू झाला तर बहुतांश पोपट हे जखमी झाले आहेत. जखमी पोपटांवर वनविभागकडून उपचार करण्यात येत आहेत.

मराठवाडा, विदर्भात गारपिटीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंच आहे, पण पोपटांच्या मृत्यूनं सगळीकडे हळहळ व्यक्त होतेय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close