आॅनर किलिंग : आई-वडिलांनीच घोटला मुलीचा गळा

मालेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता पण तिची हत्या आई-वडिलांनी केल्याची गंभीर बाबसमोर आलीये.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2018 06:13 PM IST

आॅनर किलिंग : आई-वडिलांनीच घोटला मुलीचा गळा

नाशिक, 04 ऑक्टोबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता पण तिच्या हत्या जन्मदात्या आई-वडिलांनीच केल्याची गंभीर बाबसमोर आलीये. तरुणीचा आई-वडिलांनीच चूलत भावाच्या मदतीनं हत्या केली. खोट्या प्रतिष्ठेसाठी आॅनर किंलिंगच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागातली ही घटना आहे दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली होती. संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांनी वेगाने सुत्र हालवली आणि घडलेला प्रकार समोर आला. मुलीच्या आई वडिलांनी मुलीने प्रेम संबंध ठेवले म्हणून गळा आवळून खून केल्याचं कबूल केलंय. मृत मुलीच्या आई-वडिलांनी चुलत भावाच्या मदतीने मुलीची हत्या केली.

दरम्यान छावणी पोलिसांनी मृत तरुणीची आई सुनिता चौधरी, वडील शरद चौधरी आणि चूलत भाऊ निलेश चौधरीवर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलं. या प्रकरणी आणखी कुणाचा हात आहे का ?, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...