पावसाअभावी पिकं करपली, शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली

पावसाअभावी पिकं करपली, शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली

. ऐडके यांच्याकडे 3 एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा बँकेसह, खाजगी सावकाराचे कर्ज होते.

  • Share this:

17 आॅगस्ट : मराठवाड्यात अस्मानी संकटामुळे हताश झालेल्या शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. परभणीमध्ये एक तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील जवळा झुटे गावात राहणारे चांडीकराम ऐडके या तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवलीये. ऐडके हे गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होते. आज त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं. ऐडके यांच्याकडे 3 एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा बँकेसह, खाजगी सावकाराचे कर्ज होते. पावसाअभावी पीक जळून गेल्याने त्यांनी  आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या 15 दिवसात जवळा झुटा येथे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 07:00 PM IST

ताज्या बातम्या