बाईक हटवली नाही म्हणून डाॅक्टराचा तरुणावर गोळीबार

बंद पडलेली मोटारसायकल बाजूला काढायला वेळ लागल्यानं परभणीत एका डॉक्टरानं थेट मोटारसायकल स्वारावर गोळीबारच केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 09:40 PM IST

बाईक हटवली नाही म्हणून डाॅक्टराचा तरुणावर गोळीबार

30 आॅक्टोबर : माणसांचा संयम सुटत चाललाय का ?, असा प्रश्न पडावा अशी धक्कादायक घडना परभणीत घडलीये. बंद पडलेली मोटारसायकल बाजूला काढायला वेळ लागल्यानं परभणीत एका डॉक्टरानं थेट मोटारसायकल स्वारावर गोळीबारच केलाय. यात एक जण जखमी झाला असून डॉक्टराने केलेल्या या प्रतापानं शहरात खळबळ उडालीय.

रविवारी रात्री दोन युवक मोटारसायकल वरून जात असताना त्यांची गाडी बंद पडली तेवढ्यात मागच्या दिशेने शहरातील डॉक्टर प्रसाद मगर यांची गाडी आली. तेव्हा तात्काळ तुमची गाडी काढा असं म्हणत डॉक्टराने या युवकांसोबत बाचाबाची केली अन् तेवढ्यातच डॉक्टरने थेट बंदूक काढून त्यांच्यावर गोळीच झाडली.

यात विश्वंभर सावंत या युवकाच्या पायाला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर डॉक्टर आणि युवकांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत शिवाय पोलिसांनी डॉक्टरला अटक ही केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...