पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक जमिनीवर कोसळले, मुलाचा जागीच मृत्यू

मुरुड समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक खाली पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 02:56 PM IST

पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक जमिनीवर कोसळले, मुलाचा जागीच मृत्यू

रायगड, 25 मे- मुरुड समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक खाली पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. वेदांत गणेश पवार (15) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील गणेश पवार गंभीर जखमी झाले त्यांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. पॅरासेलिंग चालकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणिकडोह धरणात उलटली होडी, तीन आदिवासी तरुणांचा बुडून मृत्यू

गणेश पवार हे मुलगा वेदांत व कुटूंबासह पुणे, कसबा रोड येथीस रहिवासी आहेत. ते मुरुड येथे फिरण्यास आले होते. त्यावेळी समुद्रावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद घेत होते. मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पॅरासेलिंग करण्यासाठी पवार बापलेक दोघेही गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून जमिनीवर कोसळले.

या अपघातात वेदांतचा जागीच मृत्यू झाला तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमी गणेश पवार यांना मुरुड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. वेदांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुगणल्यात पाठविण्यात आले आहे. या अपघाताबाबत पॅरासेलिंग चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुरुड पोलीस ठाण्यात सुरू होती.

अश्लील मेसेज पाठवून केली शरीरसुखाची मागणी, BJPच्या माजी स्वीकृत नगरसेवकावर गुन्हा

Loading...


VIDEO:महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...