डेक्कन क्वीनची डायनिंग कार खासगीकरणाच्या वाटेवर; रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी नाराज

डेक्कन क्वीनची डायनिंग कार खासगीकरणाच्या वाटेवर; रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी नाराज

देशातील 12 हजार 500 रेल्वेंपैकी फक्त डेक्कन क्वीन या पुणे मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट मध्येच डायनिंग कार आहे. पुणे मुंबई येण जाणं करणाऱ्या प्रवाशांकरता ही ट्रेन फॅमिली ट्रेनच आहे.

  • Share this:

पुणे,05 ऑक्टोबर: गेली 88 वर्षं प्रवाशांच्या सेवेत असणाऱ्या दक्खनच्या राणीची डायनिंग कार अर्थात खानपान सेवा खाजगीकरणाच्या ट्रॅकवर आली आहे. कुणाचीही तक्रार नसताना डेक्कन क्वीनची डायनिंग कार ठेकेदाराच्या घशात घालण्याच्या निर्णयाने रेल्वे कर्मचारी आणि मुंबई पुणे येणं जाणं करणारे प्रवासी कमालीचे संतप्त, नाराज झाले आहेत.

देशातील 12 हजार 500 रेल्वेंपैकी फक्त डेक्कन क्वीन या पुणे मुंबई इंटरसिटी सुपरफास्ट मध्येच डायनिंग कार आहे. पुणे मुंबई येण जाणं करणाऱ्या प्रवाशांकरता ही ट्रेन फॅमिली ट्रेनच आहे. गेली 88 वर्षे डेक्कन क्वीनमधील कटलेट, टोस्ट सॅन्डविच, उपमा, अंडा आमलेट असे स्वादिष्ट,रुचकर पदार्थ स्वच्छता चोख सेवा यामुळे डायनिंग कार लोकप्रिय आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने सध्याही सेवा रेल्वेकडून काढून घ्यायचा निर्णय घेतलाय. दिल्लीच्या व्हेरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेसला 16 लाख 51 हजार रुपये अधिक 18 टक्के जीएसटीवर ठेका देण्याचं 6 महिन्यांसाठी आयआरसीटीसीने लिमिटेड टेंडर काढलंय. कोणतीही तक्रार नसताना असं करणं हा तुघलकी निर्णय असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 10:37 AM IST

ताज्या बातम्या