S M L

पानसरे हत्या प्रकरण: आरोपींच्या माहिती देणाऱ्यास 50 लाखाचं बक्षीस!

कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी एटीएसने पत्रक जारी केले.

Updated On: Apr 13, 2019 09:10 PM IST

पानसरे हत्या प्रकरण: आरोपींच्या माहिती देणाऱ्यास 50 लाखाचं बक्षीस!

कोल्हापूर, 13 एप्रिल: कॉ.गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी विशेष तपास पथकाने (एस.आय.टी) आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.

पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीने विनय बाबुराव पवार (रा.उंब्रज,ता.कराड, जि.सातारा) आणि सांरग दिलीप आकोळकर (कुलकर्णी), (रा.डी.50 डी.एस.के.चिंतामणी अपार्टमेंट, 519 शनिवार पेठ, पुणे) या दोघांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे दोघे पानसरे हत्या प्रकरणी संशयीत फरारी आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र सरकार आणि गृह विभागाकडून प्रत्येकी 25 लाख रुपयेप्रमाणे एकूण 50 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.संबंधित संशयीत आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील या पत्रकात म्हटले आहे.Loading...

SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 09:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close