सलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला

भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2017 08:12 PM IST

सलग दुसऱ्या वर्षी भगवानगड वर्चस्व वाद चिघळला

साहेबराव कोकणे, 20 सप्टेंबर : भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढच्या वर्षी दसऱ्याला गड मला बोलवेल असं पंकजा मुंडे भगवानगडाच्या पायथ्याशी म्हणाल्या होत्या. पण वर्षभरात ना गडानं पंकजा मुंडेंना बोलावलं ना नामदेवशास्त्रींची भूमिका बदलली. उलट नामदेवशास्त्री आपल्या भूमिकेवरच ठाम राहिले.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी मेळाव्याची तयारीही सुरू केली. तरीही नामदेवशास्त्री बधत नाही म्हटल्यावर पंकजा समर्थक सुपारीची भाषा करू लागले.

या प्रकरणी पंकजांवरच टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.

भगवानगड हे धार्मिक स्थळ असलं तरी वंजारी समाजाचं राजकीय नेतृत्व कोण करणार यातूनच यावर्षीही दसरा मेळाव्याचा वाद उफाळून आलाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...