पंकजा मुंडेंची घोड्यावर मिरवणूक, मराठा बांधवांच्या वतीने जाहीर ऋणनिर्देश सत्कार

राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाने मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केला.काही दिवसानंतर राष्ट्रवादीला शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 07:21 PM IST

पंकजा मुंडेंची घोड्यावर मिरवणूक, मराठा बांधवांच्या वतीने जाहीर ऋणनिर्देश सत्कार

बीड, 11 जुलै- राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाने मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केला.काही दिवसानंतर राष्ट्रवादीला शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.

परळी शहरात मराठा समाजच्या वतीने आयोजित सत्कार व ऋणनिर्देश सोहळ्यात पंकजा बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाचे नेते व्यासपीठावर उपस्थिती होते. परळी शहरात दुपारी पंकजा मुंडेंची घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. तसेच मोटारसायकल रैलीत देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई काही आजची नाही. गेल्या अनेक वर्षाची लढाई आहे. ज्या समाजाने राज्यकर्ता सरदार म्हणून राहिला, त्या समाजाची पीछे हाट कां झाली? हा समाजाच्या मनात प्रश्न आहे. यांचे उत्तर दिले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मराठा समाजाचा फक्त राजकीय वापर केला, अशी घणाघाती टीका केली. राष्ट्रवादी हा जातीवादी करणारा पक्ष आहे. या पक्ष्याला काही दिवसानंतर शोधण्यासाठी दुर्बिणीच्या वापर करावा लागणार आहे, असे ही पंकजा मुंडें म्हणाल्या.

राजकारणाचा उदय झाला तेव्हापासून प्रमुखपदे, मंत्री असेल मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री , शिक्षणमंत्री, सहकारमंत्री सगळी पदे मराठा समाजांच्या ताब्यात राहिलेली आहेत. तरी मराठा समाजआर्थिक दृष्टीने मागास का राहिला तर आपल्या समाजाच्या जीवावर आरूढ होवून राजकरण करणारानी फक्त आणि फक्त खुर्च्यावर जाऊन स्वतःचा विचार केला. समाजाला मोठं करण्याचं काम केले नाही, अशी जहरी टीका पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांवर केली.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे नवे निर्णय जाहीर, या आहे 18 महत्त्वाच्या बातम्या

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...