S M L

"मी लहान होते,तुम्ही मोठे व्हा,गडावर फक्त 20 मिनिटं द्या",पंकजांचं भावनिक पत्र

मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या अशी भावनिक साद पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींना घातली.

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2017 04:40 PM IST

27 सप्टेंबर : भगवानगडावर दसरा मेळाव्यावरुन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे मठाधिपती महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यातला वाद याहीही वर्षी कायम आहे. नामदेव शास्त्रींनी गडावर मेळाव्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतलीये. त्यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच भूमिका घेत भावनिक साद घातलीये. "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" काही नको फक्त 20 मिनिटं वेळ द्या अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.

पंकजा मुंडे यांनी नामदेव महाराज शास्त्री यांनी पत्र लिहून गडावर दसरा मेळाव्यासाठी भावनिक मागणी केलीये. "आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते आहे आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवलं, कोणी मध्ये नको मीच विनंती करते असं म्हणत पंकजांनी यावेळी कोणताही वाद नको अशी भूमिकाच घेतलीये.

"मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" कृपया त्या असंख्य लोकांकडे बघा! काही नको त्यांना फक्त 20 मिनिट वेळ वर्षातून द्या.. मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या अशी भावनिक साद पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींना घातली.पंकजा मुंडेंचं संपूर्ण पत्र जशाचा तसं...

आदरणी मठाधिपती न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री,

श्री क्षेत्र भगवान गड,

Loading...

                                                                                

       "तसं आपल्यात काय झालं या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते आहे आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवलं, कोणी मध्ये नको मीच विनंती करते. शेवटी मी लहानच आहे, वारणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमात तसं म्हणाले होते ही "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" कृपया त्या असंख्य लोकांकडे बघा! काही नको त्यांना फक्त 20 मिनिट वेळ वर्षातून द्या..ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही...त्यांना काय मिळतं? तर त्यांना फाटक्या कुडात राहायची ऊर्जा मिळते, उन्हातान्हात राबायची ताकत मिळते, वेदनेत हसण्याची शक्ती मिळते, त्यांच्या किडकिडीत छातीत अभिमान भरुन नेतात, उर भरुन उत्साह घेऊन जातात...काट्या कुपट्यात, उन्हातान्हात राबतात, कोणी ऊसाच्या फडात तर कोणी रानात कोणी मुंबई सेंट्रलवर 4 बॅगा उतलून घेतं 3 ऐवजी कोणी चेंबूरमध्ये राजत्रभर टॅक्सी चालवतं, कोणी पोलीस वाला राबतो ट्रॅफिकमध्ये नाक्यावर, कष्ट करतात परंतु, हे सर्व भूषणाने स्वाभिमानानने वावरतात तो स्वाभिमान वाढवणं आपल्याला जमलं तर करावं पण तो हिरावून घेऊ नये हे नक्की...

मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळले राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. त्यांच्या डोळ्यात अश्रू असं न का पण जिवंतपणा असून देत यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे...समाज बांधणं जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये...भक्तांना त्रास होऊ नये, कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करुन सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा...शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळेच आहोत आणि त्यांच्यासाठी करणं आपलं कर्तव्यच आहे...

 आपली

 ( पंकजा मुंडे)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 04:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close