'काट्यात फेकून दिलेल्या 'त्या' नवजात चिमुरडीची आई-बाप म्हणून सरकार काळजी घेणार'

'काट्यात फेकून दिलेल्या 'त्या' नवजात चिमुरडीची आई-बाप म्हणून सरकार काळजी घेणार'

सरकार 'त्या' मुलींची आई-बाप म्हणून काळजी घेईल.. पण, अशा घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. बीड तालुक्यात कपीलधारवाडी येथे दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांचे स्त्री जातीचे नवजात शिशू काटेरी बाभळीत आढळून आल्याची धक्कादायक उघडकीस आली होती

  • Share this:

बीड, 1 मे- सरकार 'त्या' मुलींची आई-बाप म्हणून काळजी घेईल.. पण, अशा घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.  बीड तालुक्यात कपीलधारवाडी येथे दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांचे स्त्री जातीचे नवजात शिशू काटेरी बाभळीत आढळून आल्याची धक्कादायक उघडकीस आली होती. त्या नकोशीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  पंकजा मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन त्या नवजात शिशूबाबत डॉक्टरांना विचारपूस केली.  पंकजा ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये आल्या होत्या.

पंकजा म्हणाल्या, "सरकारनेच सर्व काही केलं पाहिजे, असं कसं होईल. नागरिक म्हणूनही आपले काही कर्तव्य आहे. जबाबदारी आहे. कोणी रात्रीच्या वेळी एखादे बाळ फेकून दिले तर त्याची सरकार म्हणून काळजी घेवू. समाजाच्या या मानसिकतेचा तीव्र शब्दात त्यांनी निषेधही व्यक्त केला.

काय आहे ही घटना?

बीड तालुक्यातील कपीलधारवाडी येथे सोमवारी (ता. 29) सकाळी दोन दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत बाळ काटेरी बाभळीत आढळून आले होते.  अत्यंत वाईट म्हणजे काटेरी बाभळीत बाळाची नाळ अडकली होती. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब प्रार्तंविधीस बाहेर जाणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात आली. ज्यावेळी बाळाला पाहिले त्यावेळी काटेरी बाभळीला ते लटकत होते. बाळाची नाळ ही काटयाला अडकवलेली होती. नागरिकांनी बाळाला तात्काळ खाली उतरवले आणि बीडच्या रुग्णालयात दाखल केले.

सध्या या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  मागील 15 दिवसांतील ही दुसरी घटना असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे,  बीडमध्ये माणुसकी शिल्लक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 01:16 PM IST

ताज्या बातम्या