मला जो कटू अनुभव आला,तो अजित-सुप्रियांच्या वाट्याला येऊ नये -पंकजा मुंडे

मला जो कटू अनुभव आला,तो अजित-सुप्रियांच्या वाट्याला येऊ नये -पंकजा मुंडे

"मला जो बहिणभावाच्या ताटातुटीचा कटू अनुभव आला तो अजित पवार सुप्रिया सुळे यांना येऊ नये "

  • Share this:

10 नोव्हेंबर : "भावा-बहिण्याच्या नात्यात ज्या वेदना मला झालाय त्या सुप्रिया सुळेंना होऊ नये, एवढीच माझी प्रार्थना आहे" हे वक्तव्य आहे महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांचं.

बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे हे समिकरण...पण इथंही काका आणि पुतण्याचं राजकीय युद्ध रंगलं होतं.  गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर यांचं रुपांतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या लढाईत झालं.  पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या नात्यातली झालेली ताटातूट संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पंकजांना अजूनही ती सल बोचत असते. पण एका बहिणीला दुसऱ्या बहिणीची काळजी वाटणंही स्वाभाविक आहे.

पुण्यात एका पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंनी आपली सल बोलून दाखवली. मला जो बहिणभावाच्या ताटातुटीचा कटू अनुभव आला तो अजित पवार सुप्रिया सुळे यांना येऊ नये असं पंकजांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 09:58 PM IST

ताज्या बातम्या