'बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू', पंकजांचं धनंजय मुंडेंना आव्हान

'बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू', पंकजांचं धनंजय मुंडेंना आव्हान

‘महाराष्ट्रातून भाजपचे सर्वात जास्त खासदार निवडून द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झेंडा फडकवण्याची संधी देणार नाही.’

  • Share this:

बीड, 23 फेब्रुवारी : ‘ राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीमध्ये करताय, परळी काय राज्याची राजधानी आहे का? असं असेल तर बीडमध्ये यांचं डिपॉजिट जप्त करणार,’ असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘महाराष्ट्रातून भाजपचे सर्वात जास्त खासदार निवडून द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झेंडा फडकवण्याची संधी देणार नाही,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचं आवाहन केलं.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

- कार्यकर्त्यांनी छाती तानून मैदानात उतरा

- भाजप कार्यकर्ता विजयाचा खरा शिल्पकार असणार आहे.

Loading...

- तुम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्र्यांनी काय काम केली हे मतदारांना सांगा.

- एक पक्ष आहे जो परिवाराचा आहे, पण भाजप हाच परिवार आहे.

- कार्यकर्त्यांनी जर सरकारची काम सांगितली नाही तर या मेळाव्यांना काही उपयोग नाही.

- सत्तेच्या ओघात काही कार्यकर्ते निराश झालेत. पण प्रतिष्ठेची करू नका कारण सत्ता गेली तर प्रतिष्ठा राहणार नाही.

- पद बघायला सोपी आहेत मात्र उपभोगायला अवघड आहेत.

- विजयाचा पाया रचण्याची वेळ आहे.

- सर्वत्र आपला विजय झालाय, आता काही ठिकाणी किरकोळ पराभव झाला मात्र निराश न होता कामाला लागा.

- आता सैनिकांवर झालेला हल्ला मोदीजी परतावून लावतील हा विश्वास आहे.

- पाया मजबूत असलेलं सरकार येणार आहे


VIDEO : बाळासह आई गाडीतून पडली, ट्रकखाली येण्यापासून थोडक्यात बचावला चिमुकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...