S M L

VIDEO : राम कदमांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

'राम कदमांना काय म्हणायचं होतं,त्यांच्या काय हेतू होता याच्याकडे कुणी पाहणार नाही'

Updated On: Sep 7, 2018 05:55 PM IST

VIDEO : राम कदमांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

शिर्डी, 07 सप्टेंबर : भाजप आमदार राम कदमांना काय म्हणायचं होतं,त्यांच्या काय हेतू होता याच्याकडे कुणी पाहणार नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यातून चुकीचा संदेश गेला असून त्यांनी त्याबद्दल दिलगीरीही व्यक्त केली असल्याचं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. आज शिर्डीत आल्यावर त्या पत्रकारांशी बोलत असताना मुंडे यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (शुक्रवारी) सकाळी नगर जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात साईंबाबांच्या दर्शनाने केली. त्यांच्यासोबत पती अमित पालवेही हजर होते दोघांनी साईमंदिरात बाबांचे पाद्यपुजन करत दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. राम कदमांचा बोलण्याचा हेतू काय होता, याच्याकडे कुणी पाहणार नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यातून चुकीचा संदेश गेला असून त्यांनी त्याबद्दल दिलगीरीही व्यक्त केली आहे असं म्हंटलंय.

संघर्ष शब्द काँग्रेसला शोभत नाही. फक्त संघर्ष नाव देऊन संघर्षयात्रा होत नाही त्यासाठी संघर्षच करावा लागतो. केवळ संघर्ष नाव दिले म्हणजे संघर्ष केला असं होत नाही. तुम्ही कितीही संघर्ष यात्रा काढल्या तरी  2019 ला जनता आमच्या विकासाला साथ देतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांना आम्ही घरी बसू देणार नाही, त्यांनी राजकारणात कायम सक्रीय राहावं अशी विनंती आम्ही करू असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. तसंच यावेळचा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मस्थानी सावरगावला होणार असं स्पष्ट करत भगवानगड दसरा मेळावा वादावर मुंडेंनी पडदा टाकलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 05:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close