S M L

मुंडे-शास्त्री वादामुळे दसरा मेळावा पुन्हा चर्चेत

पंकजा मुंडे यांचे भाषण होण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 17, 2017 08:56 PM IST

मुंडे-शास्त्री वादामुळे दसरा मेळावा पुन्हा चर्चेत

अहमदनगर,17 सप्टेंबर: मागच्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी भगवानगडावरचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.पंकजा मुंडे यांचे भाषण होण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

पंकजा मुंडे यांचं भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात भाषण होणारच असा निर्धार पंकजा मुंडे समर्थकांनी केलाय. दसऱ्याच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भाषण होणारच असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर दुसरीकडं पंकजा यांच्या भाषणाला मंहत नामदेव शास्त्रींचा विरोध कायम आहे. मेळाव्यात राजकीय भाषण नको अशी त्यांची भूमिका आहे.

त्यामुळे यंदाचा मेळावा होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 08:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close