'बाबा मला तुमची आठवण येतेय', पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

'बाबा मला तुमची आठवण येतेय', पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

आपल्या वडीलांच्या आठवणी पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये पंकजा यांनी एका रडणाऱ्या लहान मुलींचा फोटो देखील शेअर केला आहे.

  • Share this:

23 मार्च : महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या अंगणवाडी सेविकांच्या मेस्मा कायद्यामुळे चर्चेत आहेत. पण दरम्यान त्यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून एक सूचक पोस्ट केली आहे. दिवंगत वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत असल्याचं त्यांनी पोस्टमधून सूचित केलं आहे.

गोपीनाथ मुंडे हे भाजपचे दिव्यंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. पण कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा ते 64 वर्षांचे होते. 3 जून 2014ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आपल्या वडीलांच्या आठवणी पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये पंकजा यांनी एका रडणाऱ्या लहान मुलींचा फोटो देखील शेअर केला आहे. 'मला एकाकी वाटतंय' अशा आशयाची पोस्ट पंकजा मुंडेंनी फेसबुकवर शेअर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 09:50 AM IST

ताज्या बातम्या