S M L

माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

'आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आपण तसं वक्तव्य केलं होतं'

Updated On: Jul 27, 2018 01:20 PM IST

माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

बीड, 26 जुलै : मराठा समाजाला आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मात्र या वक्तव्याला राजकीय रंग मिळण्याची शक्यता दिसताच पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आपण तसं वक्तव्य केलं. मुखमंत्र्यांना शक्य असतं तर त्यांनीही लगेच सही केली असती असही त्या म्हणाल्या. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवणारं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे

Loading...
Loading...

पंकजा मुंडे यांनी आज परळीत जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पण तुम्ही शांततेनं आंदोलन करा, कायदा हातात घेऊ नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्यात.

सेनेचे खासदार खैरेंची आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली!

मी इथं तुमची दूत म्हणून आली आहे, तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री ते पंतप्रधानांपर्यंत मराठा आरक्षणासाठी जाणार आहे असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. याआधीही पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना आत्महत्या करून नका, तुमचा जीव महत्त्वाचा आहे असं भावनिक आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं होतं.

राजीनामा सत्र सुरुच, या आमदाराने थेट तुरूंगातुन पाठवला राजीनामा

दरम्यान,मराठा आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्या आमदारानेही राजीनामा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. भालके यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवला आहे. आतापर्यंत एकूण तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक बोलावलीये. यात राज्यातले सर्व मंत्री सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मराठा आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 10:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close