पाणी फाऊन्डेशनचं आज गावोगावी महाश्रमदान; आमिर, आलियासह दिग्गज सहभागी

आमिर खान आणि आलीया भट आज लातूरच्या औसा तालुक्यातल्या फतेपूर गावात श्रमदान करतायत. सकाळपासून तिथे शेकडो जण श्रमदान करत आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: May 1, 2018 10:35 AM IST

पाणी फाऊन्डेशनचं आज गावोगावी महाश्रमदान; आमिर, आलियासह  दिग्गज सहभागी

01 मे: आज महाराष्ट्र दिनानिमित्त  पाणी फाउंडेशनद्वारे गावांमध्ये महाश्रमदान राबविण्यात येतंय. या महाश्रमदानात पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासियांनी देखील सहभाग घ्या असं आवाहन अभिनेता आमिर खान यांनं केलंय.

आमिर खान आणि आलीया भट आज लातूरच्या औसा तालुक्यातल्या फतेपूर गावात श्रमदान करतायत. सकाळपासून तिथे शेकडो जण श्रमदान करत आहेत. राज्यात अनेक खेडोपाडी हे श्रमदान करण्यात येतं आहे. या महाश्रमदानाता दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिलं जाणार आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील जवळच्या गावात जाऊन कमीत कमी ३ तास श्रमदान करावं असं आवाहन आमिरने केलं.

याशिवाय सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अमेय वाघ, अलोक राजवाडे-पर्ण पेठे हे कलाकारही विविध ठिकाणी महाश्रमदान करत आहेत. गिरीश कुलकर्णी,  ज्योती सुभाष ,अमेय वाघ यांचे पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे श्रमदान करत आहेत. तर या श्रमदानाला पर्याय नसून श्रमदान करणं अपरिहार्य असल्याचं मतं सई ताम्हणकरने न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त केलं आहे.

सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले आहेत. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...