कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन

पांडुरंग फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. प्रचंड जनाधार लाभलेल्या या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते.

  • Share this:

खामगाव, 01 जून : राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी म्हणजे खामगाव इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. प्रचंड जनाधार लाभलेल्या या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते.

फुंडकर यांना अखरेचा निरोप देण्यासाठी भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सदाभाऊ खोत, विनोद तावडे, प्रवीण पोटे इत्यादी नेते उपस्थित होते.

काल पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 01:51 PM IST

ताज्या बातम्या