विठ्ठल मंदिर आता चोविस तास दर्शनासाठी खुले करणार

आषाढी यात्रेचा सोहळा हा प्रत्येक वारकऱ्यांसाठी दिवाळी दसऱ्यासारखाच आहे. त्यामुळे मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 08:45 PM IST

विठ्ठल मंदिर आता चोविस तास दर्शनासाठी खुले करणार

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 3 जुलै : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 4 ते 22 जुलै  दरम्यान भाविकांना दर्शनासाठी विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं राहणार आहे. तर 3 जुलै पासून ऑनलाईन दर्शन सुविधा काही दिवसांसाठी बंद केली जाणार आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून विविध साधू संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात मान्सूनच्या पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने यावर्षी आषाढीसाठी येणाऱ्या  भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. दरम्यान प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही.त्यामुळे मंदिर समितीने वारीपूर्वी आणि नंतर भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी  येत्या 4 जुलै ते 22 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर  भाविकांसाठी  दर्शनासाठी 24 तास खुले  ठेवण्याचा निर्णय घेतलाय. जास्तित जास्त भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी दरवर्षी हा निर्णय घेतला जातो. कारण लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात.

SPECIAL REPORT: वारीतही लोककलेचा वारसा जपणारे 'वासुदेव'

4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नित्यपूजा करून देवाचा पलंग काढला जाणार आहे. वारी काळात देव  भक्ताना दर्शनासाठी  24 तास उभ्या असतो.  देवाला थकवा जाणवू नये म्हणून लोड ही देण्यात येतो. या काळात देवाचे नित्योपचार आणि पूजा बंद असतात. वारी झाल्यानंतर प्रक्षाळ पूजेनंतर देवाचे सर्व निपोत्याचार सुरु होतात.

विठ्ठल मंदिर रोषणाईने सजलं

Loading...

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी" दिवाळी दसऱ्याच्या सणा मध्ये ज्याप्रमाणे आकाशकंदील लावून दिवे लावून आपल्या घरी रोषणाई करतो तसचं हा आषाढी यात्रेचा सोहळा हा प्रत्येक वारकऱ्यांसाठी दिवाळी दसऱ्यासारखाच आहे. याचं आषाढी यात्रेच्या भव्य सोहळ्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर लखलखून गेल आहे. मंदिर समितीने प्रथमच अशा पध्दतीने  आकर्षक विविध रंगाच्या छटांनी मंदीराचा सर्व परिसर उजळवून टाकला आहे.

हे नयनरम्य दृश्य प्रत्येक वारकरी आपल्या डोळ्यात साठवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...